सोशल मीडियावर फोटो अपलोड करून तरुणीची बदनामी : एका विरुद्ध गुन्हा

0

जळगाव;- सोशल मीडियावरील फेसबुक वर एका अनोळखी फेसबुक खातेधारकाने एका तीस वर्षीय तरुणीचा फोटो स्टेटसला ठेवून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील एका महिलेचे फेसबुक अकाउंट असून त्यामध्ये सुनील खराटे नामक अनोळखी फेसबुक खातेधारकांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून लिंक घेऊन महिलेच्या खात्यातील प्रोफाइल व स्टेटस आणि फोटो ठेवून फिर्यादीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार 28 रोजी उघडकीस आल्याने तरुणीने 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सायबर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात फेसबुक धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.