दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात चाकू मारून केले जखमी

0

पहूर;- तालुक्यातील शेंदुर्णी येथील वाडी दरवाजा येथे दारूच्या नशेत एकाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना 28 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोयगाव रस्त्यावरील गोतमारे कट्ट्याजवळ घडली. या प्रकरणी पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मनोज रमेश अग्रवाल वय 31 हे व्यावसायिक असून वाडी दरवाजा शेंदुर्णी येथे वास्तव्याला आहेत. आरोपी रोहित पाटील ,लखन बाबुराव राजपूत दोन्ही राहणार वाडी दरवाजा शेंदुर्णी यांनी दारूच्या नशेमध्ये काहीही कारण नसताना मनोज अग्रवाल यांच्या डोक्यावर चाकूने वार करून दुखापत करून आमच्याविरुद्ध फिर्याद दिल्यास तुला कट्ट्याने जिवंत मारून टाकू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. याबाबत मनोज अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोहित पाटील लखन राजपूत या दोघांविरुद्ध पौर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.