जुन्या भांडणाच्या वादातून लाकडी दांडक्याने मारहाण

0

चोपडा ;- तालुक्यातील चुंचाळे येथे मागील भांडण्याचा कारणावरून एकाला शिवीगाळ करून त्यांनी मारहाण करून लाकडी दांड्याने डोक्यावर वार करून दुखापत केल्याची घटना 30 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सुनील लक्ष्मण कोळी वय 40 हे हात मजुरी करीत असून चुंचाळे गावी राहतात. मागील बांधण्याचा कारणावरून आरोपी भगवान पितांबर कोळी राहणार चिंचाळे, तालुका चोपडा यांनी 30 रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुनील कोळी यांना शिवगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात जोराने मारून दुखापत केल्याची घटना घडली. . याप्रकरणी सुनील कोळी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला भगवान कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महिंद्र साळुंखे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.