सिमेंटचे मटेरियल खड्डा भरण्यासाठी घेतल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण

0

जळगाव ;– शहरातील तांबापुरा परिसरात असणाऱ्या गवळी वाड्यात राहणाऱ्या एकाने करण्याच्या कामाच्या जागेवरून सिमेंटचे मटेरियल खड्डा भरण्यासाठी घेतल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी दांड्याने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना 30 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तंबापुरातील गवळीवाडा येथे राहणारे दिनेश राजू भोई वय 37 हे व्यापारी असून त्यांनी काँक्रिटीकरणाच्या कामाच्या जागेवरून सिमेंटचे मटेरियल खड्डा भरण्यासाठी घेतल्याच्या कारणावरून आरोपी नाना हटकर पूर्ण नाव माहित नाही, आदेश नाना हटकर आणि राहुल नाना हटकर तिन्ही राहणार तंबापुरा गवळीवाडा यांनी 30 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी दिनेश भोई यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून नाना हटकर यांनी लोखंडे दांड्याने गवंडी कामाच्या खातीने डोक्यावर मारून जखमी केले . तसेच राहुल हटकर यांनी लाथा बुक्क्यांनी पोटात मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दिनेश भोई यांच्या आई तुळसाबाई हिला सुद्धा तिघांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दिनेश यांना मारण्याची धमकी दिली म्हणून एमआयडीसी पोलीस स्टेशनला 30 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.