गोडाऊन मधून तीन हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर चोरली

0

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर भागातील डाळफड येथे घराला लागून असलेल्या एका गोडाऊनमधून तीन हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 27 रोजी रात्री आठ ते सकाळी 28 रोजी दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला प्रकाशचंद भालचंद पुरोहित वय 60 यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अलका वानखेडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.