मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

0

अमळनेर;– तालुक्यातील दहिवद खुर्द येथील बत्तीस वर्षीय तरुणाचा मागील भांडणाचा कारणावरून त्याला जबर मारहाण करून त्याचा मृतदेह लोन भाणे फाट्याजवळ लेंडी नाल्याच्या पात्रात फेकून खून करणाऱ्या एका विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , दहिवद खुर्द येथील रहिवासी प्रवीण पांडुरंग पाटील वय 32 या तरुणाला मागील बांधण्याच्या कारणावरून जबर मारहाण करून आरोपी अशोक प्रकाश पाटील राहणार दहिवद खुर्द , टाकरखेडा तालुका अमळनेर जि. जळगाव यांनी दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी रात्री ९ ते 23 एप्रिल 2023 रोजीच्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान प्रवीण पाटील याला मोटरसायकलवर बसवून नेले होते. प्रवीण पाटील हा न आल्याने त्याच्या आईने फोन करून आरोपी अशोक पाटील याला विचारणा केली असता त्याने फोन बंद केला होता. तसेच प्रवीण पाटील हा सकाळी लोन भाणे फाट्याजवळील लेंडिं नाल्याजवळ मयत अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या शरीरावर अंगावर डोक्यावर कपाळावर गुडघ्या वर मारल्याच्या जखमा दिसून आल्या होत्या. याप्रकरणी आरोपीने मयत प्रवीण पाटील यांना जबर मारहाण करून खून करून पुरावा नष्ट केला म्हणून न्यायालयात दाद मागितल्याने अखेर 29 सप्टेंबर रोजी आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.