तुर्कीमध्ये पोलीस मुख्यालयावर गोळीबार, २ दहशदवादी ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तुर्कीची राजधानी अंकारा येथे पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी संसदेजवळ मोठा स्फोट झाला. मीडिया रिपोर्टनुसार दहशतवाद्यांनी अंकारा येथील मंत्रालयाच्या इमारतींसमोर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात एका दहशतवाद्याचा स्फोटात मृत्यू झाला तर दुसऱ्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाई दरम्यान चकमकीत मारला गेला.

तुर्कीचे मंत्री अली येरलिकाया यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, हे दोन दहशतवादी कमर्शियल वाहनाने राष्ट्रीय पोलीस मुख्यालयाच्या इमारतीजवळ आले आणि त्यापैकी एकाने स्वतःला उडवले. तर दुसरा दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. याशिवाय कारवाईदरम्यान दोन पोलीस अधिकारीही किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान या हल्ल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.