जेवणासाठी पैसे न दिल्याचा राग मनात ठेऊन युवकावर प्राणघातक हल्ला ; दोघांना अटक

0

जळगाव ;- गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका युवकाला मागील काही दिवसांपासून जेवणासाठी दोन जणांनी पैसे मागितल्याचा राग मनात ठेवत युवकावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मराठी शाळे समोर शनिमंदिर परिसरात घडली . याप्रकरामुळे खळबळ उडाली असून दोन्ही हल्ला करणाऱ्या आरोपींच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, अमिरखान रहिमखान (वय-२७) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा युवक राहत आहे. काही दिवसांपुर्वी रिक्षा चालक सचिन जगन्नाथ शिंपी (वय-२२) याने अमिरखान यांच्याजवळ जेवण करण्यासाठी पैसे मागितले होते ते दिले नव्हते. याचा राग सचिन शिंपीच्या मनात होता. दरम्यान, शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील शनीमंदीर परिसरात अमिरखान रहिमखान याला सचिन शिंपी आणि त्यांच्यासोबत सिध्दार्थ आरूण सुर्यवंशी हे भेटले. त्यावेळी अमिरखानने सचिनकडे दुर्लक्ष करत बोलणे टाळले. हा राग सहन न झाल्याने सचिन शिंपी याने हातातील चॉपरने पोटावर वार करून जखमी झाले. तसेच सोबत असलेला सिध्दार्थ अरूण सुर्यवंशी याने जखमी असतांना कोणतीही मदत न करता पसार झाले. याप्रकरणी जखमी झालेल्या अमिरखान याने शुद्धीवर आल्यावर शनिवारी ३० सप्टेंबर रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.