‘या’ भाजप खासदाराचे महिला खासदारासोबत गैरवर्तन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशाच्या अलिगढमधील भाजप खासदार सतीश गौतम सध्या चर्चेत आहेत. भाजप खासदार सतीश गौतम एका महिला खासदारासोबत भरसभेत गैरवर्तन करतांनाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सतीश गौतम चर्चेत आले आहे. व्हिडिओमध्ये सतीश गौतम यांचं वर्तन आक्षेपार्ह असल्याने त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

भाजप आमदारच महिलेशी गैरवर्तन
या व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसत आहे. भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा कोळ भागात आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्याचवेळी हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी सतीश गौतम यांनी मुक्ता राजा यांचा हात पकडला मग, खांदा दाबल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना उपस्थितांच्या कॅमेरामध्ये चित्रीत झाली आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.