अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे २ ऑक्टोबरला अनावरण

0

अमळनेर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी मंडळ अमळनेर आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण 2 ऑक्टोंबर रोजी बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ व्ही. एल माहेश्वरी यांच्या हस्ते होत आहे. हा सोहळा बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल कंपाउंड, अमळनेर येथे सकाळी 10.30 वाजता होईल.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंत्री अनिल भाईदास पाटील भूषविणार असून खा. शि. मंडळ अमळनेरचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे यांची विशेष उपस्थिती असेल. प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ बी एस पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आ. साहेबराव पाटील, माजी आ.स्मिताताई वाघ उपस्थित राहणार आहेत.

वाचनप्रेमी, साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील नागरिक बंधू व भगिनी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन म.वा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, हेमंत बाळापूरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.