एसीबीने लाच घेतांना सहाय्यक उपनिरीक्षकासह दोघांना रंगेहात पकडले…

अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी मागितली होती लाच...

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकासह अन्य दोघा पोलिसांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यातच रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. बामणोद बीटचे एएसआय हेंमत सांगळे यांच्यासह किरण चाटे, महेश वंजारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. व तीन्ही आरोपीतांविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपूर भागातील अवैध धंदे चालकाकडे सट्टा-पत्त्याचा धंदा नियमित सुरू ठेवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयीतांनी पाच हजारांची लाच शुक्रवारी मागून त्यावर चार हजारात तडजोड केली मात्र याबाबत धंदे चालकाने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. फैजपूर पोलिस ठाण्याच्या आवारात चार हजार घेताना एएसआय सांगळे यांना अटक करण्यात आल्यानंतर अन्य दोघांचाही सहभाग आढळल्याने त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.

पोलिस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.के.बच्छाव, दिनेशसिंग पाटील, ईश्वर धनगर, राकेश दुसाणे, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे,शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, प्रदिप पोळ , सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी,प्रणेश ठाकुर यांच्यासह आदींनी कारवाई केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.