सांगलीच्या प्रतीक्षाने घडवला इतिहास; ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी…

0

 

 

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सांगलीत रंगलेली पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज थरारक अंतिम सामन्याने संपन्न झाली. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील होतं. यामध्ये सांगलीची प्रतीक्षा बागडे आणि कल्याणची वैष्णवी पाटील या दोघांच्या मध्ये ही लढत पार पडली. या अंतिम सामन्यात सांगलीच्या प्रतीक्षा बागडेने इतिहास घडवला आहे. तिने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे.

पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कधीकाळी दोघी एकाच रूममध्ये राहत होत्या. तेव्हा मैत्रिणींमधील या लढतीची उत्सुकता सर्वांमध्ये होती अखेर प्रतीक्षा बागडी वैष्णवी पाटीलला चितपट करून ही स्पर्धा जिंकली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद याच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. हलगीच्या निनादात मैदानातून चांदीच्या गदाची फेरी काढण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.