रेल्वेतून पडून ४० वर्षीय इसमाचा मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

तालुक्यातील माहेजी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने मुंबई येथील एका ४० वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. २७ रोजी घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील माहेजी रेल्वे स्थानकाजवळ दि. २७ जुलै रोजी रेल्वे कि. मी. खंबा क्रंमाक ३८६ / १ नजीक कोणत्या धावत्या रेल्वेतून पडल्याने उत्तम नरेन पाॅल (वय – ४०) रा. नालासोपारा (मुंबई) या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती माहेजी रेल्वे प्रबंधकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयत उत्तम पाॅल यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here