रेल्वे मालधक्क्यावरील धान्य मातीमोल; तर काही गुराढोरांच्या तोंडाशी

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर  रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म दोन नजिक असलेलय माल धक्कावर नेहमीप्रमाणे माल उतवला जातो.  मात्र बऱ्याच वेळा माल उतरविताना मालाची नासाडी होत असते. बऱ्याचदा पडलेला माल हा वेळवर उचलला जात नसल्याने तो मातीमोल होत असतो.

आज सकाळी अमळनेर रेल्वे स्थानकानजीक रेल्वे धक्क्यावर  गव्हाच्या धान्याचे ढिगारे पडले आहेत. तर काही ढिगारे ओल्या स्वरूपात तर काही ढिगाऱ्यांवर गुरे चरताना दिसुन आली.

रेल्वेच्या प्रत्येक मालवाहतुकीने आलेल्या मालावर लक्ष ठेवण्याचे काम रेल्वे वाहतूक खाते म्हणजे वाणिज्य प्रतिबंधक यांची असते. तर बऱ्याच वेळा धान्य वाहतूक करतांना मोठ्या प्रमाणात गळती होत असते. ही गळती होता कामा नये, तो पडायला नको याची काळजी घ्यायला हवी. रेल्वे वाहतुकीत दूध, डिझेल, पेट्रोल सारख्या देखील वाहिल्या जातात. पण या कधी सांडताना गळताना दिसत नाही. यांची काळजी घेतली जाते. त्या वस्तू महागड्या आहेत म्हणून का ?

धान्य सांडत असतांना याची काळजी का घेतली जात नाही. ही किमती वस्तू नाही का ? मग सांडलेला माल वेळेवर का उचलला जात नाही ? त्याला ओला का होऊ दिले जाते. त्या धान्याच्या ठिकाणी गुरेढोरे  कशी पोहोचतात ? असा प्रश्न हे दृश्य पाहणाऱ्यांना पडला आहे.

तरी रेल्वे वाणिज्य विभागाचे प्रतिबंधक यांनी यावर त्वरित कार्यवाही करावी. हे नुकसान थांबवावं.  एकीकडे धान्याचा भाव हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर दुसरीकडे धान्याची नासाडी होत चालली आहे.  धान्य नासाडी रोखली तर गरीबाच्या पोटाला तेवढा आधार मिळू शकतो.  धान्य हे जगण्याचं साधन आहे. वेळेवर धान्य पोहचवणे जेवढे आवश्यक आहे. तेवढी त्या धान्याची  काळजी घेणे रेल्वे प्रशासनाचे काम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.