शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपयांचे बक्षीस

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (janta dal ) नेते एचडी कुमारस्वामी (h d kumarswami ) यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न (marriage ) करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणात्यांनी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एचडी कुमारस्वामी म्हणाले की, सध्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करण्यास तयार नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी मुलींना दोन लाख रुपये दिले जातील. जी मुलगी शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करेल अशा मुलींना 2 लाखांचे बक्षीस देणारी योजना आणली जाईल. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. असेही म्हटले जात आहे.शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या तरुणांसाठी हा एक चांगला निर्णय ठरेल, असेही कुमार स्वामी यावेळी म्हणाले. यामुळे आता सत्ता कोणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या 10 मे रोजी होत आहे. तर या निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.