‘स्त्री’ पुन्हा येणार, रिलीज डेटची झाली घोषणा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘ओ स्त्री कल आना’ हा फेमस डायलॉग ऐकलं कि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा ‘स्त्री’ हा चित्रपट आपल्या समोर येतो. ‘स्त्री’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा तुफान गाजला. आता या सिनेमाचा सीक्वल येतो आहे. ‘स्त्री २’च्या रिलीज डेटची घोषणा झाली आहे. काल रात्री जिओ स्टुडिओच्या (JioStudio) एका इव्हेंटमध्ये बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली. आमिर खान, हृतिक रोशन, अभिषेक बच्चन, राजकुमार राव, श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, वरूण धवन असे सगळे यावेळी हजर होते. याच इव्हेंटमध्ये ‘स्त्री २’ची घोषणा करण्यात आली. ‘भेडिया २’चीही घोषणा यावेळी करण्यात आली. या सिनेमांची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली.

‘स्त्री २’ चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘स्त्री २’मध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा (Aparashakti Khurana), अभिषेक बॅनर्जी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा ३१ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होईल. सोबतच ‘भेडिया २’ (Bhediya 2)ची देखील घोषणा करण्यात आली. गेल्यावर्षी ‘भेडिया’ रिलीज झाला होता. यात वरूण धवन मुख्य भूमिकेत होता. ‘भेडिया’ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता हा सिनेमा तुम्ही ओटीटीवर बघू शकणार आहात. येत्या २१ एप्रिलला हा सिनेमा जिओ सिनेमावर रिलीज होतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.