धक्कादायक; माझं सगळ संपल… मी चालले… नोट लिहून 13 वर्षीय मुलीची आत्महत्या…

0

 

आष्टी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

“मला आयपीएस व्हायच होतं झाले नाही. माझं सगळ संपल माझ्या ताईला कारखेलला घेऊन जा मी चालले…” अशी सुसाईड नोट लिहून 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. दिक्षा बाबासाहेब शेलार असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती आपल्या मामाच्या गावाला राहत होती.

आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील दिक्षा बाबासाहेब शेलार ही बीडसांगवी येथील ससे वस्तीवरील आजोळी दुसरीत असल्यापासून आजोबा, मामाकडे राहत होती. दीक्षाचे आई, वडील उसतोड कामगार असल्याने मामा तिचा सांभाळ करत होता.

काल घरातील सर्वजण शेतात काम करत होते. घरी एकटीच असलेल्या दिक्षाने सायंकाळ ६ वाजेच्या दरम्यान ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवले. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.