मुलांना वाहन दिल्यास पालकांना होणार शिक्षा

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

नाशिक (Nashik) शहरात 1 एप्रिलपासून ही कारवाई सुरू होण्याची शक्यता असून त्याबाबत हालचाली सुरू आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून प्रादेशिक परिवहन विभागाच्या (Regional Transport Department) वतीने अनेकांना रडारवर घेतलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याचं अनेकदा निदर्शनास आलेले आहे. आणि त्याच दृष्टीने आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती आणि त्यासोबतच कारवाई देखील केली जात आहे. नाशिकचे प्रादेशिक परिवहनाकडून आता कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जनजागृती करूनही अनेक पालक आपल्या मुलांना वाहन देत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता थेट पालकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी प्रदीप अहिरे यांनी याबाबत शाळा, कॉलेज परिसरात जाऊन वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही अनेक पालक विद्यार्थ्यांना विना परवाना वाहनं देत आहे. नाशिक शहरात विना परवाना अनेक मुलं वाहन चालवतांना आढळून आले आहे. यामध्ये आता मुलांच्या पालकांवर दंडाची आणि शिक्षा होईल अशी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये थेट पालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.