व्हॉईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी नरवाडे, कार्याध्यक्षपदी पाटील

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांच्या संघटनेची रावेर तालुका कार्यकारणी निश्चित करण्यासाठी आणि या संघटनेची ध्येयधोरणे समजावून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील पत्रकारांच्या आजच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील बाजार समितीच्या सभापती कक्षात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिलीप वैद्य होते.

सुरवातीला व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश उज्जैनवाल यांनी तालुक्यातील उपस्थित पत्रकारांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित पत्रकारांनी आपापसांत चर्चा करून तालुका कार्यकारिणी निवडली. उपस्थित पत्रकार बंधूंना त्यात प्राधान्याने सहभागी करून घेण्यात आले.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

अध्यक्ष- वासुदेव नरवाडे, कार्याध्यक्ष – प्रकाश पाटील, उपाध्यक्ष – ईश्वर महाजन आणि प्रवीण पाटील, सावदा, सचिव – प्रवीण पाटील, रावेर, जॉइंट सेक्रेटरी – सुनील चौधरी, कोषाध्यक्ष – कैलास लवंगडे, संघटन सचिव – अनिल आसेकर, सदस्य- ज्ञानेश्वर महाजन, ऐनपूर, किरण शेलोडे, निंबोल, युसूफ खाटिक, विवरा, रवींद्र महाजन,रावेर, पंकज पाटील, कोचूर.

बैठकीत संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद टोके, चिनावल आणि चंद्रकांत विचवे उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे श्री वैद्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.