मोरगांव रस्त्याकडे आमदार साहेबांचे लक्ष जाईल का ?..नागरिकांचा प्रश्न

0

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मोरगांव ता.रावेर मोरगाव खुर्द ते मोरगाव बुद्रुक हा दोन किलोमीटर चा रस्ता शेवटच्या घटका मोजतानां दिसतो आहे. याचे कारण म्हणजे गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याची नुसती डागडुजी झालेली आहे. प्रत्यक्षात रस्ता डांबरखडी टाकून किंवा रोलर करून प्रक्रियेप्रमाणे बनवलेला नाही. निवडणुका येतात आणि जातात. लोकप्रतिनिधी येतात आणि जातात. परंतु असे दिसते की रस्त्याविषयी कोणत्याही लोकप्रतिनिधींना काम करावसं वाटत नाही. प्रत्येक वर्षी दिवाळी झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल! अशी आशा रस्त्याने नेहमी जाणारे येणारे नागरिक करीत असतात. परंतु पाहता पाहता पावसाळ्याला सुरुवात होते व परत दिवाळीची आस धरली जाते. हे चक्र गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे. तरी कृपया या रस्त्याकडे आमदार साहेबांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे व रस्त्याची झालेली चाळण संबंधित विभागाने दुरुस्त करावी अशी आर्त हाक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून संबंधित विभागाला संबंधित आमदारांना केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.