स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांना जिल्हे जाहीर

0

गुलाबराव पाटील जळगाव,गिरीश महाजन नाशिक तर अनिल पाटील बुलढाणा येथे ध्वजारोहण करणार

जळगाव;- राज्य सरकारने भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांना जिल्हे वाटप केले आहे. त्यानुसार जळगावचे ध्वजारोहण नेहमीप्रमाणे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच करतील. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पालकमंत्री म्हणून असणारा दुसरा जिल्हा बुलढाणा येथे जळगाव जिल्ह्यातील दुसरे मंत्री अनिल पाटील हे ध्वजारोहण करणार आहेत. तसेच गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद असणाऱ्या तीन जिल्ह्यांपैकी त्यांना कोणताच जिल्हा दिलेला नाही. तर महाजन यांना नाशिक जिल्ह्याचे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. धुळे येथे दादा भुसे तर नंदुरबार येथे पालकमंत्री विजयकुमार गावित हे ध्वजारोहण करतील.

दरम्यान,राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी हेच ध्वजारोहण करणार आहे. यात रायगड, गोंदिया, वर्धा, हिंगोली, भंडारा, अकोला, नांदेड यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई येथे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर येथे ध्वजारोहण करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस – नागपूर

अजित पवार – कोल्हापूर

छगन भुजबळ – अमरावती

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर

चंद्रकांत पाटील – पुणे

दिलीप वळसे पाटील – वाशिम

राधाकृष्ण विखे पाटील – नगर

गिरीश महाजन – नाशिक

दादा भूसे – धुळे

गुलाबराव पाटील – जळगाव

रवींद्र चव्हाण – ठाणे

हसन मुश्रीफ – सोलापूर

दीपक केसरकर – सिंधूदूर्ग

उदय सावंत – रत्नागिरी

अतूल सावे – परभणी

संदीपान भुमरे – औरंगाबाद

सुरेश खाडे – सांगली

विजयकुमार गावित – नंदूरबार

तानाजी सावंत – उस्मानाबाद

शंभूराजे देसाई – सातारा

अब्दुल सत्तार – जालना

संजय राठोड – यवतमाळ

धनंजय मुंडे – बीड

धर्मराव अत्राम – गडचिरोली

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

संजय बनसोडे – लातूर

अनिल पाटील – बुलडाणा

अदिती तटकरे – पालघर

रायगड – जिल्हाधिकारी

हिंगोली – जिल्हाधिकारी

वर्धा – जिल्हाधिकारी

गोंदिया – जिल्हाधिकारी

भंडारा – जिल्हाधिकारी

अकोला – जिल्हाधिकारी

नांदेड -जिल्हाधिकारी

विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील ध्वजारोहण अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.