जुन्या वादातून एकाच्या डोक्यात फरशी मारून केले जखमी ; तिघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव;- जुन्या वादातून व्यापारी तरुणाच्या डोक्यात फरशी टाकून त्याला जखमी केल्याची घटना शहरातील न्यु सम्राट कॉलनी येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी गुरुवार १० ऑगस्ट रोजी दुपारी   एमआयडीसी पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील न्यु सम्राट कॉलनी येथे रोशन ऊर्फ बबलू हिरालाल धनगर वय २२ हा राहत असून . बुधवार, ९ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रोशन हा मेडीकलवरुन औषधी घेवून येत असतांना, जुन्या वादातून धिरज दत्ताऋय हिरवाळे, नेहा दत्तात्रय हिरवाळे व रत्ना दत्तात्रय हिरवाळे सर्व रा. न्यु सम्राट कॉलनी या तिघांनी शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी रोशन याला तसेच त्याच्या आईलाही मारहाण केली.

धीरज याने मागून येवून रोशन याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला दुखापत केली, याप्रकरणी जखमी रोशन याने दुसऱ्या दिवशी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन धिरज दत्ताऋय हिरवाळे, नेहा दत्तात्रय हिरवाळे व रत्ना दत्तात्रय हिरवाळे सर्व रा. न्यु सम्राट कॉलनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.