शेतकऱ्याला मारहाण ; ६ जणांवर गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगाव ; शेतातील केळीचे पैसे घेवून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याची दुचाकी आडवून बेदम मारहाण करून खिश्यातील ५० हजारांची  रोकडसह सोन्याची चैन आणि अंगठी जबरदस्ती ने  हिसकावून चोरी केल्याचा प्रकार घडला होता . निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा.  भादली खुर्द ता. जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटना बाबत अशी माहीती मिळाली. निवृत्ती गंगाराम साळुंखे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांच्या शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. ते त्यांच्या शेतातील विक्री केलेल्या केळी चे  पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता किनोद येथे गेले होते.

पैसे घेतल्यानंतर ते कठोरा गावाच्या मार्गाने भादली खूर्द येथे दुचाकी क्रमांक (एमएच १९ ७३६१) ने  परतत होते. त्याच्यासोबत गावातील प्रकाश छबुलाल पाटील हे देखील होते. सायंकाळी सात वाजेच्या संशयित आरोपी सागर लक्ष्मण सपकाळे, दिक्षीत बळीराम सपकाळे, निलेश भगवान सपकाळे, जगदीश पुंडलिक सपकाळे, यशवंत गोकूळ सपकाळे, भूषण ज्ञानेश्वर पाटील रा. कठोरा ता. जि. जळगाव यांनी काहीही कारण नसतांना रस्ता आडविला. यातील एकाने लाकडी दांडा डोक्यावर टाकला. यात  निवृत्ती हे गंभीर जखमी झाले होते.

त्यांना तातडीन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निवृत्ती साळुंखे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.