मोठी बातमी.. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन अखेर महाराष्ट्रात येवून धडकला आहे. दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेला एक 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे.

या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवी व्हेरिएंट आढळून आल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले त्यानंतर गुजरातमध्ये एक रुग्ण आढळून आला. त्यापाठोपाठ ज्याची भिती होती तेच झाले आहे.

महाराष्ट्रात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण हा डोंबिवलीमध्ये आढळून आला आहे.

दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक 33 वर्षीय तरुण हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील ही पहिली केस आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच, कल्याण डोंबिवलीमध्ये परदेशातून आलेले सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

नायजेरिया,रशिया आणि नेपाळ मधून केडीएमसी क्षेत्रात आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. या सहा ही जणांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.