जळगाव जिल्ह्यात आज दोन कोरोना बाधित रुग्ण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात भुसावळ येथे दोन कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे.

भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंट या नव्या विषाणूने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काल कर्नाटक येथे दोन ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असून आज गुजरातमधील जामनगर येथे एक तर महाराष्ट्रात सुद्धा ओमिक्रॉनने आता शिरकाव केला असून मुंबईमधील डोंबिवली येथे एक रुग्ण निष्पन्न झाला आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 11 आहे. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.