कामधेनु गोशाळेला पशुधन देण्याचा आदेश सञ न्यायालयाकडून रद्द ..!

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अतिरिक्त सञ न्यायाधीश जळगाव डि.एन. खडसे यांनी धरणगाव न्यायालयाचा कामधेनु गोशाळेला पशुधन देण्याचा आदेश रद्द ठरवुन गुरांच्या मालकांना पशुधन देण्याचे आदेश पारीत केले आहेत.

२० जुलै २०२१ रोजी बकरी ईदच्या दिवशी धरणगाव पोलिस स्टेशनचे अंबादास मोरे व इतर कर्मचाऱ्यांना शेख रफीक शेख मुसा, जमिल अहमद खान, शेख शरीफ मुसा सर्व रा. धरणगाव यांच्या ताब्यात २० गुरे (पशुधन) आढळुन आली. त्यानुसार संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल होऊन सर्व गुरे कामधेनु गोशाळा धरणगाव यांच्या ताब्यात देण्यात आली.

शेख रफीक शेख मुसा वगैरेंनी पशुधनाचे कायदेशीर मालक म्हणुन पशुधन ताब्यात देण्याचा रितसर आदेश प्राप्त करण्यासाठी धरणगाव न्यायालयाकडे विनंती अर्ज केले. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग धरणगाव एस.डी. सावरकर यांनी अर्ज नामंजूर करून जप्त केलेले वळू कामधेनु गो-शाळा धरणगाव यांच्या ताब्यात व कब्जात देण्याचा आदेश केला.

धरणगाव न्यायालयाच्या आदेशाविरूध्द शेख रफीक शेख मुसा वगैरेंनी जिल्हा व सञ न्यायालय जळगाव यांच्याकडे फौजदारी रिव्हीजन अर्ज दाखल केले. अतिरिक्त सञ न्यायाधीश डि.एन. खडसे यांनी तीनही फौजदारी रिव्हीजन अर्ज मंजूर करून धरणगाव न्यायालयाचा पशुधनाचा आदेश रद्द ठरवुन शे.रफीक शे.मुसा वगैरेंना २० वळूंचा ताबा देण्याचा आदेश पारीत केला. शे.रफीक शे.मुसा वगैरेंकडून अँड. मोहन शुक्ला यांनी कामकाज पाहीले त्यांना अँड सुजीत पाठक यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.