महाविद्यालये बंद होणार ? उदय सामंतांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेट्वर्क 

दिवसेंदिवस  राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

आज सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक पार पडली. त्यात हा निर्णय़ घेण्यात आला आहे. बैठकीत सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. तसेच विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयं सुरू ठेवायची की नाही या संदर्भात उद्या संध्याकाळी 4 वाजता निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये नववीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद

कोरोनाचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. ओमिक्रॉन  व्हेरियंटचा धोका वाढला असून त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे  प्रमुख आयएस चहल यांनी सांगितलंय की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ते 9 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत एक पत्र जाहीर करण्यात आलंय. त्या पत्रात म्हटलंय की, सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमीकोन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या प्रजातीचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमिक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ.9 वी व 11 वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ने दि. 31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत.

विद्यार्थ्याचे तथापि, इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरु राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणा-या 15 ने 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.