भाजपला पराभूत करत यावल विकासोमधून विनोदकुमार पाटील विजयी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावल विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून विनोदकुमार पंडित पाटील यांनी विजय मिळविला आहे.

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावल विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून  भारतीय जनता पक्षाचे विद्यमान संचालक गणेश नेहेते याना पराभूत करत सहकार पॅनलचे विनोदकुमार पंडित पाटील यांनी विजय मिळवला आहे.  गणेश नेहते हे सलग दुसर्‍यांदा विजय मिळवून जिल्हा बँक संचालक बनतील असे संकेत वर्तवले जात होते. मात्र निकालातून वेगळेच चित्र स्पष्ट झाले आहे.

तर आज झालेल्या मतमोजणीत विनोदकुमार पाटील यांना २६ तर गणेश नेहेते यांना २२ मते मिळाली. यावरून विनोदकुमार पाटील यांनी विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.