विद्यार्थ्यांनी किमतीच्या जगातून मूल्यांच्या जगात जाणे आवश्यक आहे .. डॉ. विश्वासराव पाटील

0

एसडी-सीड तर्फे १४ वा शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न

जळगाव: विद्यार्थ्यांनी किमतीच्या जगातून निघून मूल्यांच्या जगात जायचे आहे आणि तिथे जाऊन न थांबता सरप्लस मूल्यांच्या जगात जायचे आहे. मी गरीब असेल साधारण परिस्थिती असेल तर खचून जायचे नाही. जगात सर्वात मौल्यवान जर काही असेल तर ते आईचे दुध आहे. मुल्ये सुद्धा आईच्या दुध प्रमाणे आहेत की ज्यांना विकताही येत नाही आणि विकतही घेता येत नाही असे मार्गदर्शन प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वासराव पाटील (शहादा) यांनी केले.
एसडी-सीड अर्थातच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना रविवारी माजी मंत्री एसडी-सीडचे आधारस्थंभ सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिष्यवृत्तीचे वितरण ७ शिवाजी नगर येथे करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वासराव पाटील हे उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, शहराच्या महापौर सौ. जयश्री महाजन, माजी महापौर रमेशदादा जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, मेजर नाना वाणी, मीनाक्षी जैन, गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी हे उपस्थित होते.

शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले तसेच आभार मीनाक्षी जैन यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश यावलकर, पुष्पा भंडारी आणि महेश गोरडे यांनी केले.

प्रसंगी डॉ. विश्वासराव पाटील पुढे म्हणाले की जगातील प्रत्येकच पाहिलं विद्यापीठ हे त्याची आई असते आणि सुरेशदादा यांच्या आई ज्यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते त्यांच्या प्रतिमेस नमन करून मी धन्य झालो. या जगात तीन गोष्टींसाठी सर्व खेचतान सुरु आहे ते म्हणजे सत्ता, संपत्ती आणि शस्त्र् परंतु ते कोणत्याही प्रकारची शांती देऊ शकत नाही. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, माणसाच जस जगण तस झुंजण असत व जस झुंजण असत तशी त्याची समर्पणाची भावना असते. शिक्षणामुळेच आपण मैत्री जोपासायला शिकतो, शिक्षणच आपल्याला सन्मान मिळवून देते. एसडी-सीडच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच चीज व्हाव, संधीच सोन व्हाव असे परिश्रम विद्यार्थ्यांनी करावयाला पाहिजे असा सल्ला दिला.

१० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात शिष्यवृत्ती वितरण
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते १० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाजन सेजल सुनील, दैवज्ञ हर्षवर्धन राजेंद्र, वाणी ऋतुजा शशिकांत, साळुंखे ऋषिकेश अशोक, अहिरे राजश्री सिद्धार्थ, धनगर विशाल दगडू, बारी शारदा प्रकाश, जंगम गीतेश विजय, ब-हाटे हेमांगी योगेंद्र, चौधरी मयूर संजय या विद्यार्थ्यांचा समावेश होता. उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार आहे.

एसडी-सीड उपक्रमाची ध्येयपूर्तीकडे वाटचाल

  • मागील चौदा वर्षात १४,३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
  • एकूण ३,४६९ विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण
  • ४२,१८७ विद्यार्थ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण
  • विद्यार्थी हितासाठी १४४ संस्थांसोबत सहकार्य करार
  • ८४ विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्था किंवा व्यक्तींकडून दत्तक
  • २३२५ युवतींना प्रमाणपत्रासह सशक्तीकरण प्रशिक्षण
  • २८८ हून अधिक विद्यार्थ्यांना तज्ञांकडून वैयक्तिक समुपदेशन
  • शिक्षकांना प्रशिक्षण व पालकांचे प्रबोधन
शिष्यवृत्ती प्राप्त लाभार्थी समवेत मंचावर उपस्थित असलेलेले मान्यवर
डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, राजा मयूर, महापौर जयश्री महाजन, डॉ. के.बी. पाटील, डॉ. विश्वासराव पाटील, अशोकभाऊ जैन, रमेशदादा जैन , मेजर नाना वाणी, डॉ. अजित वाघ, राजेश यावलकर, महेश गोरडे. पुष्पा भंडारी, नीलकंठ गायकवाड, अजित कुचेरिया, प्रा. डी. टी. नेहते, डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, सुरेश भंडारी, नंदलाल गादिया, अजयभाऊ ललवाणी, डॉ. एस.एस.राणे, डॉ. विवेक काटदरे, मीनाक्षी जैन, संपादक रवी टाले, आर. एस. डाकलिया, उमेश सेठिया, सागर पगारिया, सुभाष लोढा, चंद्रकांत चौधरी, सुरेश धारिवाल, प्रा. एस.व्ही. सोमवंशी, प्रा. सुरेश पांडे, जी. टी. महाजन

एसडी-सीड मेंटोरशिप प्रोग्राम घोषणा
आदरणीय सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एसडी-सीड स्कॉलरशिप वितरण समारोहात विद्यार्थ्यांसाठी “एसडी-सीड मेंटोरशिप प्रोग्रामची” घोषणा करण्यात आली. या मेंटोरिशप प्रकल्पा अंतर्गत ” मेंटोरिशपला म्हणजेच मार्गदर्शनाला प्राधान्य दिले जाणार आहे. एक मेंटोर साधारणत: ३ ते ५ विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारतील. इयता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्ये असलेले, अनुभवी व व्यवसाय कुशल मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत म्हणेज विद्यार्थ्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान होईल.
विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्याबरोबरच करिअर मार्गदर्शन तसेच जनरल मार्गदर्शन इत्यादी लहान लहान समस्यांच्या निवारणासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मेंटोर हे मानसिक, भावनिक व शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील व त्यांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी तसेच त्यांच्यात उद्योजकता व योग्य नोकरी मार्गदर्शनासाठी आपल्या अनुभव ज्ञानाचा उपयोग करत संपूर्ण काळजी घेतील.
आता पर्यंत शिष्यवृत्ती वितरणा बरोबरच इतर विविध योजनांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकता कौशल्ये, प्रशिक्षण, समर इंटर्नशिप, विविध शैक्षणिक संस्था व साधनामध्ये सवलत इत्यादी योजनाद्वारे विद्यार्थी लाभान्वित होत असतात. या सर्व सुविधांसह या वर्षापासून पासून “एसडी-सीड मेंटोरशिप प्रोग्राम सुरु करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे विविधांगी दृष्टीकोनातून सर्वांगीण विकास साधला जावा आणि भावी आयुष्यात करिअरची मोट बांधण्यासाठी तो तत्पर व्हावा हे उदिष्ट साध्य करण्यासाठी संस्थे मार्फत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.