बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा.. नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

‘बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा’ असं ट्विट करत भाजपा नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणे यांनी ट्विट मध्ये नाव न घेता हा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला आहे . या ट्विटसह व्यगंचित्र शेअर केले आहे. सोबतच Penguin हा हॅशटॅग देखील वापरला आहे. या व्यगंचित्रात आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत.

आणि ते विमानातून खाली पाहात आहेत. तसेच या व्यगंचित्रात खाली चार व्यक्ती उभ्या असलेल्या दाखवण्यात आल्या आहेत यातील एक शेतकरी यात तर दुसरी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी दिसत आहे. तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. हे सर्व हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.