पावसामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा ‘परीक्षा’ घेणार – उदय सामंत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असेही ते म्हणाले आहेत.

राज्यातील गुलाब चक्रीवादळामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा मराठवाडा, विदर्भ या भागात झाला असून पावसामुळे पुरपरिस्थीती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग व  अॅग्रीसाठीच्या सीईटी परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पुन्हा परिक्षा घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

तसेच उदय सामंत म्हणाले की, राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. असे ट्विट  त्यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.