पारोळा येथील यात्रोत्सव साधेपणाने साजरा होणार- माजी खासदार ए. टी. पाटील

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रति तिरूपती म्हणुन ओळख असलेल्या पारोळा येथील यात्रोत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याची माहिती बालाजी संस्थानचे विश्वस्त माजी खासदार ए. टी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पारोळा येथील  बालाजी मंदिर हे प्रति तिरूपती म्हणुन ओळखले जाते. या मंदिरात दरवर्षी घटस्थापनेपासुन ते कोजागीरी पोर्णिमेपर्यंत मोठ्या उत्सहात यात्रोउत्सव (रथोउत्सव) साजरा केला जातो, परंतु मागील दोन वर्षापासुन या यात्रोउत्सवावर कोरोनाचे सावट आलेले असुन यावर्षी ही कोरोना मुळे येथील  यात्रोत्सव साध्या पणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती येथील  मंदिरात आयोजित पत्रकार परिषदे मंदिराच्या विश्वस्था कडुन देण्यात आली.

तसेच राज्यातील मंदिरे ७ तारखेपासून सुरू होत असल्याने पारोळा येथील  बालाजी मंदिर देखील या  दिवसापासुन भक्तांसाठी खुले होणार आहे.  यावेळी भाविकांनी दर्शनास येताना सरकारी नियमाचे पालन करावे,  सोशल डिस्टन्स ठेवावे, मास्क शिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी ही संपुर्ण शहरात प्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शहरातील केबल नेटवर्कद्वारे श्रींचे दर्शन घर बसल्या होणार असल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी मंदिराचे प्रमुख विश्वस्थ श्रीकांत शिंपी, माजी खासदार ए. टी. पाटील, मा. नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, नगरसेवक नितिन सोनार, विश्वस्त रावसाहेब भोसले, डाॅ. अनिल गुजराथी, संजय कासार, केशव क्षत्रीय, दिनेश गुजराथी, रमेश भगवती, प्रकाश शिंपी, भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. अतुल मोरे, शहरध्यक्ष मकुंदा चौधरी, सचिन गुजराथी, नरेद्र राजपुत, चंद्रकांत शिंपी, याच्या सह इतर भाविक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.