ध्येय म्हणजे काय?

0

हे म्हणजे तुम्हाला ठराविक काळात काय हवे आहे? काय मिळवायचे आहे? ध्येय उद्दिष्ट टार्गेट गोल या सर्वांचा एक सोपा अर्थ आहे आपल्या सर्व गोष्टी करण्याची कारण! आपण जे काही करतो त्या सर्व गोष्टीचा एक उद्दिष्ट असले पाहिजे. आपण जे काही विचार करतो किंवा जे काही निर्णय घेतो ते विचार किंवा तो निर्णय आपल्याला त्या टारगेट,उद्दिष्ट, ते ध्येय त्याच्याजवळ पोचवेल का हा विचार करावा. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही आपला जो वेळ, पैसा, मेहनत, विचार कुठे ठेवले आहे ते म्हणजे ध्येय. किंवा मागील पंधरा दिवसात, दहा दिवसात, सात दिवसात किंवा 24 तासात तुम्ही जी काही मेहनत घेत आहात, जे काही करत आहात, ते करण्याचे कारण म्हणजे ध्येय असले पाहिजे.

या गोष्टींवर जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला नक्कीच कळून येईल की, आपले कोणते ध्येय आहे की नाही.  तुम्हाला कळून येईल की, तुम्ही स्वतःसाठी काम करत आहात ती दुसऱ्याच्या यशाचा पार्ट बनवायचा किंवा दुसऱ्याची ध्येय साध्य करण्याचा मार्ग बनवत आहात.  तुम्ही स्वतः काही ठरवून क्रिया करत आहात की फक्त चालत आहे म्हणून चालवत आहात? वेळ वाया घालवत आहात? काय करावं? कसं करावं? सुरुवात कुठून करावी? याचा तुमच्या डोक्यात गोंधळ झाला की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे जेव्हा तुम्ही शोधाल तेव्हा तुम्हाला खरच कळून येईल की तुमचे ध्येय तुम्ही ठरवले की नाही. एखादी गोष्ट घडवून आणण्याकरिता तिचा पाठपुरावा करावा लागतो. खरी जिद्द मेहनत करावी लागते. धरसोड करणाऱ्या व्यक्तीस कोणतेही यश मिळत नाही. तुमची मेहनत तुमचा पैसा हे सर्व विखुरले गेले तर तुम्हाला यश मिळणार नाही. जगातले महान व्यक्ती, कलाकार, क्रिकेटर, थोर महात्मे यांनी आपले लक्ष्य साध्य करताना कठोर मेहनत तन-मन-धन सर्व देऊन एकाच ध्येयाचा अभ्यास केला.

एखाद्याच्या जीवनात यश किंवा अपयश येणे ही त्याची शेवटची स्टेप असते पण त्याआधी बरच काही आहे. मुद्दा हा आहे की त्याच्या जीवनात त्यांनी कोणती ध्येय निश्चित केली होती का? आणि त्यासाठी त्यांनी योग्य ती कठोर मेहनत,वेळ दिला आहे का? बऱ्याच लोकांचा बराच वेळ हा आळस करण्यातच निघून जातो. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.  हे लहानपणी पासूनच आपल्याला शिकवण्यात येते. आळसाला दूर हाकलून हाच माणूस नवीन नवीन प्रयत्न, नवीन ध्येय आणि नवीन काम करू शकतो. आणि त्यासाठी निश्चय हा ठाम असावा आणि  यासाठी उचलण्यात येणारी पावले ही लहान लहान असावी म्हणजे झेपेल तेवढेच.

एक चित्रकार होता त्याने आपल्या कामाची सुरुवात पॅरिसमध्ये पाठव पाट्या रंगवण्या पासून केली. प्रगती करत राहिल्यामुळे तो लवकरच जगातील नामवंत कलाकार झाला. त्या चित्रकाराचे नाव पॅसिंग. हेनरी तर गाढवावर दुधाचे भरणी अडकवून त्याचे रतीब घालत असे. हाच हेनरी हा पुढे चालून अठराव्या शतकातला नावाजलेला मूर्तिकार झाला. रिचर्ड फेलो हा युरोपातील एक महान बासरीवादक. पण जीवनाच्या सुरुवातीच्या काळात तो एक दगड फोडणारा मजूर होता. या कष्टाच्या कामात जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो बासरी वाजवायचा. तसाच जागतिक  कीर्ती मिळवलेला शेक्सपियर नाटककार हा नाट्यगृह बाहेर घोडे सांभाळायचा. आपल्या साऊथचा सुपरस्टार बघा रजनीकांत म्हणजे शिवाजी गायकवाड हा सुरुवातीचा काळात बस कंडक्टर होता.

म्हणूनच आपण आपल्या कामगिरीची सुरुवात कुठून केली, कशा प्रकारे केली किंवा आपण कुठून आलो आहेत याला महत्त्व नाही. पण सुरुवातीला आपण कोणते ध्येय ठेवले आहे हे फार महत्त्वाचा आहे. ध्येय म्हणजे तुम्हाला नक्की काय हवे आहे कधी आणि किती हवे आहे ? ज्यांनी आयुष्यात यश मिळवले त्यांनी आपल्या आवडत्या विषयात काम केले किंवा त्यातच आपले ध्येय ठेवले.

तुम्ही सायंटिस्ट होऊ इच्छिता पण तुम्ही रोज क्रिकेटचे सामने बघत आहात, फक्त चित्रपटच बघत आहात तर काय उपयोग. तुम्हाला खूप श्रीमंत बनायचे आहे , मोठा उद्योगपती किंवा कोट्याधीश व्हायचे आहे तर तुम्हीही नोकरी केल्यावर ते उद्दिष्ट साध्य होणार आहे का? तर तुमच्या आवडत्या विषयातील  ध्येय ठेवा. यामुळे एक फायदा होईल ते तुम्ही कधीही काम करताना कंटाळा करणार नाही. त्याच प्रमाणे तुमचे ध्येय SMART असू द्या.

S– म्हणजे Specific ध्येय मोजक्या शब्दात, आकड्यात किंवा तारखेत लिहून ठेवा.

M– म्हणजे Measurable असू द्या याचा अर्थ असा की मला या वर्षी 50 लाख कमवायचे आहेत तर ती लिमिट काय आहे किती काळात मी हे करू शकतो.

A-म्हणजे Achievable. सुरुवातीच्या काळात तुमच्या दृष्टीपथात असेल असेच ध्येय ठेवा आपल्या आवाक्याबाहेरच्या कोणत्याही गोष्टी ठेवू नका. विशेषता सुरुवातीच्या काळात. कारण हे साध्य झाल्यानंतर तुम्हाला मोठी ध्येय ठेवता येतील.

R– म्हणजे Realistic . तुमच्या धड्यातील टप्पे जर तुम्हाला ठरवता येतील तर ते Realistic  आहे.

T– म्हणजे Time bound. तुमचे ते ध्येय तुम्हाला कोणत्या दिवसापर्यंत गाठायचे आहे ते ठरवा.

 

ऋषिकेश पिहूलकर

धामणगाव रेल्वे  (अमरावती)

संपर्क क्र. 8208407724

Leave A Reply

Your email address will not be published.