शेंदुर्णी नगरपंचायतीची प्लास्टिक व होर्डिंग विरोधात धडक मोहीम

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केद्र व राज्य सरकारने प्लास्टिक बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाची तसेच अवैध, विनापरवाना, शहराचे सौंदर्य बिघडवणारे अवैध होर्डिंग्ज याबाबत शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी धडक मोहीम सुरु केली असुन होर्डिंग्ज काढण्यात आले. तसेच  प्लास्टिक बंदीचीही कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.

केंद्र शासनाच्या पर्यावरणदिन व हवामान बदल मंत्रालयाने तसेच महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसुचनेनुसार अविघटनशिल कचऱ्यामुळे स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानाच्या अंमलबजावणी वर अनिष्ट परिणाम होत असल्याने प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशिल वस्तुंचे उत्पादन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणुक यावर बंदी घालण्यात आली असुन याची कडक अंमलबजावणी शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सुरू केली आहे.

प्लास्टिक बंदी असतांनाही याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला प्रथम ५०००/रुपये दंड दुसऱ्या वेळी १०,०००/ तर तिसऱ्या वेळी रुपये २५,०००/ व तीन महिने कैद अशी शिक्षेची तरतुद कायद्याने आहे. तरी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर, विक्री करु नये विनापरवागी होर्डिंग्ज लावु नये, असे आवाहन शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे, उपनगराध्यक्षा सौ.चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.