जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी काढणार पेन्शन संघर्ष यात्रा

0

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी. यासाठी राज्यातील लाखो कर्मचारी संपुर्ण राज्यभर पेन्शन संघर्ष यात्रा काढणार आहे. याबाबतीत अधिक माहिती देतांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रसिध्दी प्रमुख संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की सदर पेन्शन संघर्ष यात्रेचे नियोजन करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनची नियोजन सभा राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्यकार्यकारणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत चिखली जि.बुलढाणा नुकतीच पार पडली.

महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीने नुकतीच मुंबई येथे मिटींग घेऊन पेन्शन संघर्ष यात्रा काढली जावी. असे सर्वानुमते ठरविले होते. त्याअनुषंगाने आजची नियोजन सभा आयोजित केली होती. सदर नियोजन सभेत गोंदिया ते मुंबई दरम्यान पेन्शन संघर्ष यात्रा काढण्यासंदर्भात सखोल चर्चा होऊन येणाऱ्या दिवसांमध्ये ही यात्रा काढली जाईल. असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच DCPS व NPS कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय दुर होऊन जुनी पेन्शन लागु करण्यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासंदर्भात चर्चा होऊन भविष्यात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.

न्यायालयात जनहित दाखल करण्यासंदर्भात लागणारी सर्व माहिती संघटनचे रावेर येथील शिलेदार विनायक चौथे यांनी जमा करुन त्यावर अभ्यासपुर्वक माहिती चौथे यांनी सदर मिटींगमध्ये मांडली. सदर नियोजन सभेस राज्यसचिव गोविंद उगले, राज्यकार्याध्यक्ष प्राजक्त झावरे-पाटील, राज्य उपाध्यक्ष नामदेव मेटांगे, विश्वस्त रामदास वाघ, सुशिल गायकवाड, गोरव काळे, गोविंद किरकिले, अमोल शर्मा, अनिल वाकडे, हेमंत पारधी, मंगेश धनवडे, श्रीनाथराव पाटील आदी उपस्थित होते.

नियोजन सभा यशस्वी करण्यासाठी राज्य पदाधिकारी मुरलीधर टेकाळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नंदु सुसर, विभागीय उपाध्यक्ष सोमकांत साखरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अविनाश सुरळकर, उपाध्यक्षा प्रणिती हिंगणकर, जिल्हा संघटक प्रज्ञा जाधव, चिखली तालुकाध्यक्ष रामप्रसाद आरमाळ, सचिव सुनिल लहाने व सर्व तालुकाध्यक्ष व सदस्य बुलढाणा यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.