डोक्यात दगड घालून सालदाराची हत्या

0

सावदा ;- एका शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार तो राहत असलेल्या सावदा कोचुर वरील शेताच्या एका घरात आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शोभाराम रिचू बारेला ( वय ४५) असे मयत सालदाराचे नाव आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , सावदा ते कोचूर रोडच्या दरम्यान असलेल्या शेतात शोभाराम रिचू बारेला ( वय ४५) हा इसम सालदार म्हणून काम करत असून तो शेतात बांधलेल्या खोलीतच वास्तव्याला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला असून डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले असून शेतमालक बेंडाळे यांच्या शेतात घडली.

आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शोभाराम बारेला यांचा मृतदेह आढळून आला . मृतदेहावरच दगड पडलेला असल्यामुळे दगडाने ठेचून त्यांना संपविण्यात आल्याचे दिसून आले आहे. याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.याबाबत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.