बोळे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पारोळा :

एका 47 वर्षीय प्रौढाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोळे येथे घडली.

बोळे येथील सुनील नाना निकम (वय ४७) यांनी २९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या मागील खोलीतील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांना खासगी वाहनाने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सकाळी ११ वाजता त्यांना मयत घोषित केले. याबाबत अभय  निकम यांनी दिलेल्या खबरीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.