सावदा बसस्थानकावरून वृद्धेची पोत लंपास

0

सावदा, ता. रावेर :  जळगाव ते मस्कावद असा बस प्रवास करीत असतानायेथे बसमधील गर्दीचा फायदा घेत मस्कावद येथील वृद्ध महिलेची ५ ग्रॅमची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली. मस्कावद येथील कमलाबाई रमेश भालशंकर (वय ७१) ही वृद्ध महिला जळगाव ते मस्कावद दरम्यान बसने प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबल्याची घटना २७ मार्चला दुपारी १२.१५ ते ३.१५ वाजेदरम्यान जळगाव – मस्कावद दरम्यान घडली.

याबाबत कमलाबाईंच्या तक्रारीवरुन सावदा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जालिंदर पडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक मजहर पठाण करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.