चाळीसगाव येथील टोळीप्रमुखासह एक जण हद्दपार

0

चाळीसगाव : जिल्हयांत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी  पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चाळीसगाव तालुक्यातील दोघांना हद्दपार केले आहे. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीत त्यांचा सामाजिक उपद्रव निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन ६ महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले असल्याची माहीती जिल्हा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

चाळीसगाव शहरकडील हद्दपार प्रस्ताव प्रमाणे गुन्हेगार टोळी प्रमुख जगदीश जगन्नाथ महाजन (वय-५१), दादू उर्फ विशाल जगदीश महाजन (वय-२३, दोघे रा. नेताजी पालकर चौक, चाळीसगाव) यांच्याविरुध्दचा चाळीसगाव पोलीस स्टेशनला खून, खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, घातक हत्यार असे एकुण १० गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग यांनी केलेली आहे. सदरचा हद्दपार प्रस्ताव हा चाळीसगाव पोलीस स्टेशनकडून तयार करुन पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला होता. चौकशीअंती गुन्हेगारांना ६ महिनेकरीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.