चिमुकलीची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा पित्यालाआजन्म कारावास

0

जळगाव;-  शहरातील हिराशिवा पार्क येथे राहणाऱ्या पित्याने कौटुंबिक वाद आणि दारू पिण्याच्या व्यासनातून पोटच्या मुलीचा बांभोरी पुलाखाली हत्या केली होती. या गुन्ह्यात क्रूरकर्मा पित्याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता आजन्म कारावासी शिक्षा सुनावली आहे. संदीप यादव चौधरी (वय-३६) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

संदीप चौधरी हा पत्नी नयना आणि मयत मुलगी कोमल चौधरी (वय-७) यांच्यासह वास्तव्याला होता. संदीप चौधरी याला दारू पिण्याचे व्यसन होते. सतत दारूच्या नशेत राहत होता. ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी दारू पिण्यावरून पत्नी नयना चौधरी यांना मारहाण केली होती. त्यात पप्प मम्मीला मारून नका असे देखील मुलगी कोमलने संदीपला सांगितले होते. हा राग संदीपच्या मनात होता. दुपारी ४ वाजता नयना चौधरी यांनी मुलगी कोमल हिला शिकवणीला सोडले. त्यानंतर संदीप चौधरी हा शिकवणीतून चिमुकलीला परस्पर सोबत घेवून गेला. जळगाव शहरानजीक बांभोरी पुलाच्या खाली तिला खून केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला जळगाव जिल्हा न्यायलयाचे न्यायमुर्ती एम.क्यू.एस.एम शेख यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकुण १२ साक्षिदार तपासण्यात आले. साक्षिदार आणि सादर केलेल्या पुराव्या आधारे न्यायमुर्ती शेख यांनी आरोपी संदीप चौधरी याला दोषी ठावून आजन्म कारावास आणि ५ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.सुरेंद्र काबरा करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.