उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार !

0

कराड : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या उदयनराजे यांचे विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील अशी रंगतदार लढत जिल्ह्याला पहावयास मिळणार आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काही दिवसापूर्वी श्रीनिवास पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यानंतर अचानक पृथ्वीराज चव्हाण हे उदयनराजे विरोधात निवडणूक लढवतील अशा चर्चा होऊ लागल्या. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आघाडीकडून अपेक्षित बोलणी न झाल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचाच अर्ज भरणार असल्याचे सोमवारी जाहीर केले होते. त्यामुळे आज मंगळवारी सकाळी शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. गुरुवार दि. 3 रोजी पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.