पुन्हा तारीख : घरकुलातील आरोपींच्या जामिनावर ३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

0

जळगाव । राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा सुनावलेल्या आरोपींनी जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जामिनावर आज दि. १ ऑक्टोंबर रोजी  कामकाज झाले. यावेळी पुन्हा पुढील तारीख देण्यात आली असून आता पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे.

घरकुल घोटाळ्यातील आरोपींना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी जामीन तसेच जिल्हा न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायालयात कामकाज झाले. यावेळी पुन्हा तारीख देण्यात आली असून पुढील सुनावणी आता ३ ऑक्टोबर ला होणार आहे.

दरम्यान, माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह २८ जणांचे अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.