घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ !

0

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांचा खिसा आता आणखी खाली होणार आहे, कारण घरगुती सिलिंडरच्या दरात दरात आजपासून (मंगळवार) वाढ झाली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 15 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यानत 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 15 रूपये 50 पैशांची वाढ करण्यात आली होती.

दरवाढीनंतर मुंबई आणि चेन्नईमध्ये 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी अनुक्रमे 574.50 रूपये आणि 620 रूपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकात्यामध्ये 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 605 रूपये मोजावे लागतील. 19 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरची किंमत दिल्लीत 1 हजार 85 रूपये, तर कोलकात्यात आणि मुंबईत अनुक्रमे 1 हजार 139 रूपये आणि 1 हजार 32 रूपये इतकी झाली आहे. 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे नवे दर लागू असतील. नवी दिल्लीत याची किंमत 590 रूपये प्रति सिलिंडर झाली आहे. दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित केल्या जातात. दरवर्षी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी नव्या दरांची घोषणा करण्यात येते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.