भाजपाची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली १२५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. या यादीमध्ये ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली आहे.

पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. भाजपाच्या या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये १२ महिला आमदारांचा समावेश आहे. १२ मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

उत्सुकता लागून राहिलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी कसबा पेठेतून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अपेक्षेप्रमाणे साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची पहिली यादी

नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कोथरूड – चंद्रकांत पाटील
सातारा- शिवेंद्रराजे भोसले
कसबा पेठ – मुक्ता टिळक
कराड दक्षिण – अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)
बेलापूर – मंदा म्हात्रे
विलेपार्ले – पराग अळवणी
जामनेर – गिरीश महाजन
वडाळा (मुंबई) – कालिदास कोळंबकर
पुणे पर्वती – माधुरी मिसाळ
घाटकोपर (प.) – राम कदम
जळगाव जामोद – संजय कुटे
शहादा – राजेश पाडवी
जळगाव शहर – सुरेश भोळे
सिंदखेडा – जयकुमार रावल
धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती बदाणे
अमळनेर – शिरीष चौधरी
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
माण – जयकुमार गोरे
परळी – पंकजा मुंडे
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
अकोले – वैभव पिचड
राहुरी – शिवाजीराव कर्डिले
औसा – अभिमन्यू पवार
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार

Leave A Reply

Your email address will not be published.