भाजपची यादी जाहीर; खासदार उन्मेष पाटलांना धक्का

0

चाळीसगावात चव्हाण तर अमळनेरात चौधरींना उमेदवारी

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या १२५ जागांची यादी आज जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्याने कार्यकर्त्यांच्या भोया उंचावल्या आहे. भाजपच्या पहिल्या यादीत जळगाव जिल्ह्यातील ६ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. त्यात जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे (रावेर), संजय सावकारे (भुसावळ), सुरेश भोळे (जळगाव शहर), शिरीष चौधरी (अंमळनेर) या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. चाळीसगावात खासदारांमुळे उन्मेष पाटील यांना धक्का देत मंगेश रमेश चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमळनेरात विद्यमान अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्याही भाजपच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.