आ. संजय सावकारेंच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सायबर क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून यावरून लोकांना पैसै मागण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकणी त्यांनी सतर्कता दाखविल्याने हे अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले आहे.

तसेच आमदार संजय सावकारे यांनी स्वत: फेसबुक अकाऊंटसह विविध व्हाटसऍप ग्रुपमध्ये याबाबतची माहिती जाहीर केली आहे. हा सर्व खोडसाळपणाचा प्रकार असून कुणी याला बळी पडू नका असे, आवाहन आमदार सावकारे यांनी केले होते. याप्रकरणी आमदार सावकारे यांनी याबाबत फेसबुककडे तक्रार केली. यामुळे काही तासांमध्येच हे बनावट अकाऊंट आता ब्लॉक देखील करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.