शेंदुर्णी परिसरात रक्षाबंधन उत्साहात

0

शेंदुर्णी, ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्रावण महिन्यात भाऊ व बहिण यांच्या पवित्र नात्याला अधिक दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. रविवारी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हा सण शेंदुर्णी व परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळ पासुनच बाजारपेठ आकर्षक नाविण्यपुर्ण राख्यांनी सजली होती. या ठिकाणी राख्या खरेदीसाठी महिला युवती यांची गर्दी होती. सायंकाळी बहुतांश ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला. मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाने सर्व आनंदीत आहे. याच कालावधीत हा पवित्र सण साजरा करण्यात आला. एस.टी.बसेस, खाजगी लक्झरी व अन्य वाहनांमध्ये गर्दी होती, यामुळे बस स्थानक परिसरात चांगली गर्दी दिवसभर होती.

Leave A Reply

Your email address will not be published.