आर्यन खान 4 वर्षांपासून घेतोय ड्रग्ज; ‘मन्नत’ वर सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अभिनेता शाहरुख खानचा  मुलगा आर्यन खान  याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी  प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून  अटक करण्यात आली. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यातही सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटे बोलण्यास दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने भारताबाहेर यूके ,दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन केले आहे.

आर्यनचा सर्वात जवळचा मित्र अरबाज मर्चंट कुठून ड्रग्ज आणायचा याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. या प्रकरणात अजूनही छापे टाकले जात आहेत आणि मोठ्या अटकेची अपेक्षा आहे. एनसीबीचे छापे दिल्लीत सुरु असून एक टीम गोमित चोप्राच्या घरीही पोहोचली आहे. NCB च्या सूत्रांनुसार अटक प्रक्रियेनंतर, NDPS कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक आरोपीच्या घरात शोध मोहीम घेण्याचीही तरतूद आहे, अशा परिस्थितीत NCB मुंबईत सुपरस्टार शाहरुख खानचे घर मन्नतमध्ये सर्च मोहीम राबवेल असे मानले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.