गोवंशाची अवैध वाहतूक; चार लाखाचे गोवंश जप्त

0

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यात देशी, गावठी गोवंश जातीच्या जनावरांची अवैधरित्या कत्तलखान्यात वाहतूक करणारी वाहन भाजप कार्यकर्त्यांनी सापळा रचून पकडले असून आठ जनावरे व वाहतूक करणारे वाहन चालकासह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मला आमच्या कार्यकर्ते यांनी भ्रमणध्वनीवरून  सांगितले की, जामुनाथा येथे  पिकअप  क्रमांक एम.एच.०६, एजी ५५५९ या गाडीत गोवंश जातीची

जनावरे कोंबून, जखडून ठेवून कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक होत आहे व सदर गाडी ही जामुनमाथा येथून प्रतापगड मार्गे जाणार आहे. असे समजताच   कार्यकर्ते विजय कानडे, धनराज देशमुख, गणेश जाधव, मनोज पवार,  भगवान वाघमारे असे तात्काळ  घटनास्थळी दाखल झालो.  प्रतापगड गावात मारुती मंदिरासमोर गाडी येताच वाहन चालक कादिर अकिल नाईक रा. जामुन माथा यास विचारले असता त्याने  उडवा उडवीची उतरे दिली.

सदर गाडी तपासले असता त्यात आठ गोवंश जातीच्या जनावरांना दोरीने जखडून बांधून ठेवले होते, ही जनावरे कत्तलीच्या इराद्याने घेऊन जात होते. सदर घटनेची पोलिसांना  माहिती दिली असून वाहन चालक यांना ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

पोलिस निरीक्षक संदिप कोळी ,उपनिरीक्षक सागर नांद्रे, हवालदार हेमत भालेराव,हे अधिक तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.