अवैध दारुधंद्यावर छापा; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर तालुक्यातील अनेक गावांतील लोकांच्या अवैध दारुच्या तक्रारी जामनेर पोलीस ठाण्यात येत होत्या. जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार जामनेर पोलीस स्टेशनचे धडाकेबाज पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात जामनेर तालुक्यातील गाडेगांव व तळेगांव या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध प्रकारच्या गावठी हातभट्टी दारू बनविण्याच्या अडयावर धाड टाकण्यात आली असुन आढळुन आलेले कच्च्या रसायनासोबत दारु भट्टी उध्वस्त करण्यात आली आहे.

सदर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडुन २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जितेंद्र नथ्थु कोळी व प्रकाश नथ्थु कोळी दोन्ही रा. तळेगांव यांच्याकडुन सुमारे १४० लिटर दारु किंमत दहा हजार रुपये व दोन दुचाकी किंमत पंचविस हजार रुपये यांच्या सह गाडेगांव येथील परीसरात टाकलेल्या धाडीत गावठी दारु बनवणारे जितेंद्र तुळशीराम पवार, सुनिल सांडु सोनवणे, अर्जुन शालीक जाधव, उमाकांत मधुकर वराडे, सर्व रा . गाडेगांव यांच्याकडुन सुमारे एक लाख रुपयांचे गावठी दारु बनविण्याचे साहित्यासह रसायन व एक लाख रुपये किमतीची होंडाशाईन कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

नव्यानेच जामनेर पो.नि. किरण शिंदे यांनी पदभार घेताच धाडसत्रांची जणु मालिकाच लावली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने व उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पो.नि. किरण शिंदे यांच्या नेतृत्वात टाकलेल्या धाडसत्रात सहाय्यक फौजदार संजय पाटील, पो. रमेश कुमावत, निलेश घुगे, रामदास कुंभार, तुषार पाटील यांच्या पथकाने उल्लेखनिय कामगीरी बजावली. या धडाकेबाज कारवाईचे तालुका वासीयांकडुन स्वागत केले जात आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.